(Image Source : Internet)
मुंबई :
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराचा विकास पाहता अनेक कंपन्या येथे गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. शहरात नामांकित ताज ग्रुप आपले अत्याधुनिक हॉटेल उभारणार असल्याची घोषणा ताज हॉटेल्सची संचालन कंपनी इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेडने केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर कंपनीने घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताज हॉटेलच्या पायाभरणी समारंभात टाटा समूहाने नागपुरात ताज हॉटेल बांधण्याची इच्छा व्यक्त केली. भाषणाच्या समारोपातच, मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पुनीत चटवाल यांनी नागपुरात ताज ग्रुपचे हॉटेल उभारण्याची घोषणा केली.
टाटा समूहाने यापूर्वी नागपुरात हॉटेल जिंजर सुरू केले असून, त्याची दुसरी शाखा लवकरच सुरू केली जाईल, असे टाटा ग्रुपने जाहीर केले. ताज ग्रुपचा ब्रँड नागपूर शहरात येत असल्याने पर्यटन वाढीच्या दृष्टीने उपराजधानी मोठे पाऊल पुढे टाकणार आहे.