महाराष्ट्राला मिळाले नवे पोलिसप्रमुख; 26/11 मध्ये धाडसी लढा देणारे सदानंद दाते राज्याचे DGP

03 Dec 2025 23:29:21

Maharashtra new police chief
Image Source:(Internet) 
मुंबई :
प्रामाणिक नेतृत्व, कठोर शिस्त आणि दीर्घ अनुभवासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते (Sadanand Date) यांची महाराष्ट्राच्या नवे पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान DGP रश्मी शुक्ला यांच्या 31 डिसेंबर 2025 रोजीच्या निवृत्तीनंतर दाते पदभार स्वीकारणार आहेत. राज्य सरकारने पाठवलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव अग्रस्थानी असल्याने त्यांच्या नियुक्तीची मोठी चर्चा होती.
 
समृद्ध कारकीर्द आणि विविध जबाबदाऱ्यांचा ठसा-
1990 बॅचमध्ये सेवा सुरू केलेल्या दाते यांनी आर्थिक गुन्हे शाखा, सायबर क्राईम विभाग, रेल्वे पोलीस, तसेच नवी मुंबई येथे पोलीस अधीक्षक म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे. सध्या ते राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) महासंचालक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कमांडो पथकांनी अनेक जटिल मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत.
 
26/11 मध्ये दाखवलेले शौर्य आजही जिवंत-
मुंबईवर झालेल्या 26/11 च्या भीषण दहशतवादी हल्ल्यात दाते यांनी दाखवलेला पराक्रम आजही लोकांच्या स्मरणात ताजा आहे. कामा रुग्णालयात दोन दहशतवाद्यांच्या प्रवेशानंतर त्यांनी स्वतः पथक घेऊन धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणत अनेकांचे जीव वाचवले. संघर्षादरम्यान त्यांना गोळ्या लागल्या तरी त्यांनी मागे हटणे पसंत केले नाही.
 
दाते यांच्या नेतृत्वामुळे राज्य पोलिस दल अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि परिणामकारक होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
 
Powered By Sangraha 9.0