Image Source:(Internet)
नागपूर :
चांदीच्या (Silver) दरांनी पुन्हा एकदा जोरदार उसळी घेतली असून सराफा बाजारात तेजीचे वातावरण कायम आहे. देशभरातील बाजारात चांदीचे भाव सातत्याने नवे विक्रम नोंदवत आहेत. शनिवारी सकाळी नागपूर सराफा बाजारात चांदीचा दर थेट २ लाख ५३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचला.
बाजार सुरू झाल्यानंतर काही तासांतच चांदीच्या दरात तब्बल १५ हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. अवघ्या एका दिवसातील ही मोठी दरवाढ सराफा व्यापारी, ग्राहक तसेच गुंतवणूकदारांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
वाढती देशांतर्गत मागणी तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक घडामोडींचा परिणाम चांदीच्या किमतींवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्याचा तेजीचा कल पाहता येत्या काळात चांदीचे दर आणखी चढण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यामुळे सराफा बाजारात उत्सुकता वाढली आहे.