- अंतिम निकाल 21 डिसेंबरला
Image Source:(Internet)
नागपूर :
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (Elections) आज मोठी उलथापालथ झाली आहे. नागपूर खंडपीठाने दिलेल्या तातडीच्या आदेशामुळे उद्या नियोजित केलेली मतमोजणी थांबवण्यात आली आहे. त्यामुळे उद्याचा निकाल जाहीर करण्याचा कार्यक्रम रद्द झाला असून, आता निकाल 21 डिसेंबर रोजी सार्वजनिक केला जाणार आहे.
या निवडणुकांशी संबंधित काही महत्वाच्या याचिकांवर सुनावणी दरम्यान हायकोर्टाने मतमोजणी पुढे ढकलण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. या आदेशाचा परिणाम राज्यातील शेकडो नगरपालिका आणि नगरपरिषद मतमोजणी प्रक्रियेवर झाला आहे.
नवीन तारखेनुसार मतमोजणीसाठी तयारी करण्याबाबत निवडणूक आयोगाने जिल्हास्तरावर सूचना पाठवल्याची माहिती मिळते आहे. अचानक बदललेल्या वेळापत्रकामुळे उमेदवार आणि पक्षीयांमध्ये चर्चा, नाराजी आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आता राज्यातील राजकीय चित्र 21 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे. कोणाकडे सत्ता झुकते, कोणत्या पक्षाला जनतेचा बहुमताचा कौल मिळतो, याची प्रतीक्षा मतदार आणि पक्षांनी सुरू केली आहे.