माणिकराव कोकाटेंने दिला मंत्रीपदाचा राजीनामा; अजित पवारांनी स्वीकारल्याची माहिती

18 Dec 2025 23:57:15
 
Kokate resigns
 Image Source:(Internet)
मुंबई :
क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सादर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख अजित पवार यांनी हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारल्याचे समोर आले आहे. कोकाटेंवर दोन वर्षांच्या शिक्षेच्या निकालानंतर अटक वॉरंट जारी झाल्याने हा निर्णय घेतल्याचे जाणवते. या राजीनाम्यानंतर राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता वर्तवली जात आहे.
 
अजित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून कोकाटेंचा राजीनामा आणि तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आल्याचा दस्तऐवज शेअर केला. त्यांनी म्हटले की, “न्यायालयाच्या निर्णयानंतर आमचे सहकारी माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा सादर केला आहे. आमच्या पक्षाचे धोरण म्हणजे कायदा आणि नियमांचे पालन करणे, त्यामुळे हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे.”
 
राज्यातील कायदा-व्यवस्थेच्या कडक अंमलबजावणीवर विश्वास व्यक्त करत अजित पवार म्हणाले, “संवैधानिक प्रक्रियेप्रमाणे पुढील कामासाठी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. सार्वजनिक जीवन न्याय, प्रामाणिकपणा आणि संविधानिक नैतिकतेवर आधारित असायला हवे, हा आमचा निर्धार आहे. लोकशाही मूल्ये कायम राखण्यासाठी आणि जनतेच्या विश्वासाला तोटा होऊ नये यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.”
 
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकारणात येणाऱ्या मोठ्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील राजकीय हालचाली काय असतील, याकडे सध्या प्रत्येकजण तोंड लावून पाहत आहे.
Powered By Sangraha 9.0