एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा तयार? प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

13 Dec 2025 23:18:39
 
Prakash Ambedkar
 Image Source;(Internet)
मुंबई :
महाराष्ट्रातील राजकीय हालचाली पुन्हा एकदा गती पकडत आहेत. स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाकडे मोठा पक्षप्रवेश झाल्याने शिवसेना शिंदे (Shinde) गटाला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील काही मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला बहिष्कारही केला होता.
 
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर चर्चा सुरू झाली आहे की, येत्या महिनाभरांत शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा दावा करु शकतात.
 
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात थेट भविष्यवाणी करत सांगितले की, शिंदे यांनी युती मजबूत करण्यासाठी आणि सत्तेवर पुनःप्राप्ती करण्यासाठी रणनीती आखली आहे. "अमित शाह यांच्या सहकार्याने हे शक्य होईल," असे आंबेडकर म्हणाले.
 
ते म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री न बनल्याचा वाईट अनुभव शिंदे घेऊन ते पुन्हा सत्ताकडे येण्यासाठी प्रयत्न करतील. तसेच शरद पवार यांच्यासोबत झालेली बैठक राजकीय धडाक्यांची बाब असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
 
महापालिका निवडणुका आणि सत्तेच्या या लढतीमुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल घडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात या राजकीय घडामोडींवर सर्वांचं लक्ष केंद्रित झाले आहे.
Powered By Sangraha 9.0