Image Source;(Internet)
नागपूर :
एकीकडे शहरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र समोर येत आहे. बुधवारी बसवर हल्ल्याची घटना ताजी असतानाच, गुरुवारी उशिरा रात्री प्रातापनगर परिसरात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला.
गुरुवारी रात्री सुमारे ११.३० वाजता उर्वशी बारमध्ये दांडके, लोखंडी रॉड आणि धारदार हत्यारे हातात घेतलेले काही गुंड घुसले. त्या वेळी बारमध्ये बरीच गर्दी होती. मात्र अचानक हल्लेखोर आत येताच ग्राहकांनी जीव वाचवण्यासाठी थरारक पळापळ केली.
ग्राहक पळून गेल्यानंतर गुंडांनी बार मॅनेजर आणि काही कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. हाताने तसेच सोबत आणलेल्या हत्यारांनी मारहाण केल्याने काही जण जखमी झाले.
पोलीसांच्या माहितीनुसार, हेच गुंड दोन दिवसांपूर्वी बारमध्ये आले होते. त्यांनी जेवण-दारू केली पण बिल देण्यास नकार दिला. त्या वेळी किरकोळ भांडण झाले. त्याचाच नाद म्हणून त्यांनी गुरुवारी अधिक लोकांना घेऊन बारमध्ये धाड टाकल्याचे उघड झाले आहे.
या घटनेमुळे शहरातील हॉटेल व बार व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारांचा पोलिसांवरील धाकच उरला नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.