कळंबोलीत शिवसेनेला बळ; तरुणांनी मोठ्या संख्येने हाती घेतले शिवबंधन!

01 Dec 2025 20:56:06
 
Shiv Sena
 Image Source:(Internet)
मुंबई :
पनवेल महापालिका निवडणुकीच्या तयारीत शिवसेनेचा जनाधार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कळंबोली (Kalamboli) परिसरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये रविवारी शेकडो तरुणांनी शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश केला. या सामूहिक प्रवेशामुळे स्थानिक संघटनात्मक बळात लक्षणीय वाढ झाल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
 
अलीकडच्या काही दिवसांपासून जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षविस्ताराचे विविध उपक्रम पनवेल परिसरात राबवले जात आहेत. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, कळंबोलीतील नव्या तरुणांनीही शिवसेनेच्या भूमिकेवर विश्वास ठेवत भगवा स्वीकारला. शहर संघटक श्रीकांत फाळके यांनी केलेल्या सातत्यपूर्ण जनसंपर्क मोहिमेमुळे या भागात तरुणांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
 
पक्षप्रवेश सोहळ्याला उपतालुका संघटक महेंद्र पवार, शहरप्रमुख तुकाराम सरक, उपशहरप्रमुख आनंदा माने, तसेच संजय शेडगे, दीपक कोडावते, सुमित सूर्यवंशी, श्रीकांत कदम, कुमार नलावडे, रंजीत फडतरे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
 
स्थानिक पातळीवर नव्या तरुणांची झालेली ही मोठी भर पनवेलमधील निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेसाठी निर्णायक ठरणारी असून, पक्षाच्या रणनीतीला नवी चालना मिळाल्याची चर्चा कार्यकर्त्यांत सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0