भारतीय रेल्वेत ८,०५० पदांची मेगा भरती; पदवीधर आणि पदवीपूर्व उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

01 Dec 2025 22:06:12
 
Mega recruitment
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
भारतीय रेल्वे (Indian Railway) भरती बोर्डाकडून (RRB) NTPC 2025 अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. देशभरातील विविध झोन अंतर्गत Non-Technical Popular Categories या गटातील एकूण ८०५० पदांसाठी भरती केली जाणार आहे.
 
पदांची विभागणी-
NTPC Graduate (पदवीधर) : ५,००० पदे
NTPC Under Graduate (पदवीपूर्व) : ३,०५० पदे
एकूण : ८,०५० पदे
 
अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा-
पदवीधर उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख नियोजित वेळेनुसारच असून २० नोव्हेंबर २०२५ ही शेवटची तारीख आहे.
दरम्यान, पदवीपूर्व उमेदवारांसाठी २७ नोव्हेंबर ही अंतिम तारीख होती; मात्र मागणी लक्षात घेऊन ती वाढवण्यात आली असून आता ४ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
 
अर्ज प्रक्रिया कशी कराल?
उमेदवारांनी सर्वप्रथम RRB कडून जारी करण्यात आलेली अधिकृत जाहिरात नीट वाचावी.
संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असेल.
ऑनलाइन फॉर्म अचूक तपशीलांसह भरावा आणि आवश्यक कागदपत्रांची स्कॅन प्रत जोडावी.
चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज थेट बाद होऊ शकतो.
अर्ज भरताना संबंधित RRB च्या अधिकृत वेबसाइटलाच भेट द्यावी.
रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती मोठी संधी ठरणार असून पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0