Image Source:(Internet)
मुंबई :
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील विद्यार्थ्यांना सलग सुट्ट्यांचा छोटा ‘ब्रेक’ मिळणार आहे. विविध प्रशासकीय आणि स्थानिक कारणांमुळे २, ५, ६ आणि ७ डिसेंबर रोजी अनेक शाळा (Schools) बंद राहणार असल्याची माहिती शिक्षण खात्यातून समोर आली आहे.
२ डिसेंबरला राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे मतदान होणार असल्याने, मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या शाळांमध्ये त्या दिवशी अध्यापन होणार नाही. त्यानंतर ५ डिसेंबरला शिक्षक संघटनांच्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणावर शाळा बंद राहतील.
६ डिसेंबरला मुंबई आणि उपनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर आहे. शिवाय ७ डिसेंबरला रविवार असल्याने विद्यार्थ्यांना अख्खा आठवडा एकापाठोपाठ विश्रांतीचा लाभ मिळणार आहे.
या काळात काही शाळांकडून स्थानिक पातळीवरील वेगळ्या सूचना दिल्या जाण्याची शक्यता असून, पालकांनी आपल्या शाळांच्या अधिकृत नोटीसांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.