Image Source:(Internet)
नाशिक :
जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात पुन्हा एकदा हुंड्यासाठी (Dowry) छळाची धक्कादायक घटना घडली आहे. सततच्या त्रासाला कंटाळून 22 वर्षीय मोहिनी चंद्रकांत अहिरे हिने आत्महत्या केली.
मोहिनीला सासरकडून मोबाईल, गाडी आणि माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला जात होता. यावरून घरात नेहमी वाद, भांडणं आणि शिवीगाळ होत होती. या सततच्या जाचाला कंटाळून अखेर मोहिनीने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
घटनेची बातमी कळताच मोहिनीच्या माहेरच्यांनी सासरला धाव घेतली. तिथे त्यांनी संताप व्यक्त करत सासरच्या दारातच मुलीची चिता पेटवून तिचे अंत्यसंस्कार केले. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मोहिनीच्या पतीसह सहा सासरच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.