Image Source:(Internet)
मुंबई:
बॉलिवूडच्या ग्लॅमरस जोडपं कतरिना (Katrina) कैफ आणि विक्की कौशल यांचं घर आज खूप खास आनंदाने भरलं आहे. दोघं आता आई-वडील बनले असून, त्यांच्या कुटुंबात गोडसर छोटा राजकुमार आला आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
कतरिनाने वयाच्या ४२व्या वर्षी मातृत्वाचा आनंद अनुभवला आहे. विक्कीने सोशल मीडियावर लिहिलं, “आमच्या आयुष्यात नवीन प्रकाश आला आहे. अपार प्रेम आणि कृतज्ञतेने आम्ही आमच्या मुलाचं स्वागत करतोय. 7 नोव्हेंबर 2025, कतरिना आणि विक्की.”
गेल्या काही महिन्यांपासून कतरिनाच्या गर्भधारणेची चर्चा होती, पण आता त्याला अधिकृत मान्यता मिळाली आहे. सप्टेंबरमध्ये त्यांनी आपल्या पहिल्या बाळाच्या आगमनाची आनंदाची बातमी दिली होती. कतरिनाने काही दिवसांपूर्वी विक्कीसोबत बाळाचा बंप दाखवून चाहत्यांना ही खुशखबर दिली होती.
या खास प्रसंगावर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता मनीष पॉलने “तुमच्या बाळाच्या आगमनाबद्दल मनापासून अभिनंदन” असे लिहिले. रकुल प्रीत सिंह, हुमा कुरेशी, अर्जुन कपूर यांनीही रेड हार्ट इमोजीसह शुभेच्छा दिल्या आहेत.
चाहत्यांत उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच या लहानशा तारकाच्या पहिल्या फोटोची उत्सुकता सर्वांमध्ये आहे. विक्की कौशलसाठी हा पहिला ‘बाबा’पणाचा अनुभव असून, बॉलिवूडमध्येही या नव्या पालकत्वाचे स्वागत होत आहे.