सीताबर्डीतील अपहरण आणि बलात्कार प्रकरणात आरोपी निर्दोष; पुराव्यांअभावी न्यायालयाचा निर्णय

06 Nov 2025 17:07:02
 
Court decision
 Image Source:(Internet)
नागपूर :
सीताबर्डी (Sitabardi) परिसरातील अपहरण आणि बलात्कार प्रकरणात आरोपी नानक लालताप्रसाद यादव याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती एस. पी. पोंक्षे यांनी हा निकाल दिला.
 
तक्रारीनुसार, २०१७ साली पीडिता आपल्या मुलीला डबा देण्यासाठी इटर्निटी मॉलमध्ये गेली असताना आरोपीने तिचा पाठलाग करून बंदुकीच्या धाकावर अपहरण केले आणि कारमध्ये नेऊन अत्याचार केला. घटनेचा व्हिडिओ काढून धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी कपिलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
सरकारी पक्षाने पीडिता, तिची मुलगी, मुलगा, पंच आणि तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी सादर केल्या. मात्र या साक्षी विसंगत आणि अपुऱ्या असल्याचे न्यायालयाने नमूद केले. परिणामी, न्यायालयाने “सबळ पुराव्यांचा अभाव असल्याने आरोपी निर्दोष” असा निर्णय दिला.
 
या खटल्यात आरोपीच्या बाजूने ॲड. मंगेश राऊत यांनी युक्तिवाद केला, तर ॲड. नाझीया पठाण यांनी सहाय्य केले.
 
नागपूर : सीताबर्डी परिसरातील अपहरण आणि बलात्कार प्रकरणात आरोपी नानक लालताप्रसाद यादव याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती एस. पी. पोंक्षे यांनी हा निकाल दिला.
 
तक्रारीनुसार, २०१७ साली पीडिता आपल्या मुलीला डबा देण्यासाठी इटर्निटी मॉलमध्ये गेली असताना आरोपीने तिचा पाठलाग करून बंदुकीच्या धाकावर अपहरण केले आणि कारमध्ये नेऊन अत्याचार केला. घटनेचा व्हिडिओ काढून धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी कपिलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
सरकारी पक्षाने पीडिता, तिची मुलगी, मुलगा, पंच आणि तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी सादर केल्या. मात्र या साक्षी विसंगत आणि अपुऱ्या असल्याचे न्यायालयाने नमूद केले. परिणामी, न्यायालयाने “सबळ पुराव्यांचा अभाव असल्याने आरोपी निर्दोष” असा निर्णय दिला.
 
या खटल्यात आरोपीच्या बाजूने ॲड. मंगेश राऊत यांनी युक्तिवाद केला, तर ॲड. नाझीया पठाण यांनी सहाय्य केले.
Powered By Sangraha 9.0