Image Source:(Internet)
कोल्हापूर :
महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis) यांनी भाजपच्या रणनितीबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, भाजप या निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे, पूर्ण ताकदीने आणि आत्मविश्वासाने उतरून विजय मिळवेल.
फडणवीस म्हणाले, “ज्या ठिकाणी आघाडी होऊ शकते तिथे आम्ही निश्चित प्रयत्न करू. परंतु जर निवडणुकीपूर्वी आघाडी जमली नाही, तर निकालानंतरही सहकार्याचे दार बंद नाही.” त्यांच्या या वक्तव्याने राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांतील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्यात सध्या निवडणुकीचा उत्साह चढू लागला आहे. विविध पक्षांनी आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. तर भाजप मात्र स्वतंत्र लढतीसाठी तयार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवण्याचा निर्धार पक्षाने केला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.