Image Source:(Internet)
मुंबई :
महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल असा २०२५ चा विश्वविजय भारतीय महिलांनी आपल्या जिद्दीने आणि एकतेने साध्य केला आहे. या ऐतिहासिक पराक्रमाचा गौरव वाढवताना बीसीसीआयने (BCCI) तब्बल ५१ कोटी रुपयांचे पारितोषिक घोषित करत महिला क्रिकेटच्या गौरवकथेला नवा अध्याय जोडला आहे.
या रकमेने आयसीसीकडून मिळणाऱ्या पुरस्कारालाही मागे टाकले असून ती १२ कोटी रुपयांनी अधिक आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले, “१९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पुरुष संघाने जेव्हा विश्वविजय मिळवला, तेव्हा भारतीय क्रिकेटला नवा आत्मविश्वास मिळाला होता. आज हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली महिला संघाने तोच आत्मविश्वास नव्या पिढीला दिला आहे. त्यांनी फक्त सामना नाही, तर प्रत्येक भारतीयाचे हृदय जिंकले आहे.”
महिला खेळाडूंना समान वेतन देण्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर आता बीसीसीआयने पुरस्काराच्या रकमेत तब्बल ३०० टक्क्यांनी वाढ करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यामुळे एकूण पारितोषिकाची किंमत १४ दशलक्ष डॉलर्स एवढी झाली आहे.
अंतिम सामन्यात शफाली वर्मा ने केलेल्या ८७ धावांच्या तुफानी खेळीने भारताला विजयाची वाट दाखवली आणि तिला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब मिळाला. तर दीप्ती शर्मा ने फलंदाजी आणि गोलंदाजीतील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा मान पटकावला.
या विजयाने भारतीय महिलांनी २००५ आणि २०१७ मधील अपयशाचा बदला घेत इतिहास पुन्हा लिहिला आहे. हा भारताच्या क्रिकेट प्रवासातील महिलांचा पहिलाच वनडे विश्वविजय, तसेच टी२० नंतरचा दुहेरी विश्वकिरिटाचा पराक्रम ठरला आहे.