केंद्र सरकारने केली 2026 मधील सुट्ट्यांची घोषणा; कर्मचाऱ्यांना मिळाला वर्षभराचा सुट्टी आराखडा

29 Nov 2025 23:33:07
 
announces holidays
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
केंद्र सरकारने (Central government) 2026 साली लागू होणाऱ्या सर्व सरकारी सुट्ट्यांची अधिसूचना जाहीर केली असून, राजपत्रित आणि वैकल्पिक अशा दोन्ही प्रकारच्या सुट्ट्यांचा तपशील प्रसिद्ध करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सुट्ट्यांची सविस्तर माहिती देत सरकारी कार्यालये, बँका आणि शैक्षणिक संस्थांसाठी लागू होणारा अधिकृत आराखडा उपलब्ध करून दिला आहे. जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार 14 अनिवार्य सुट्ट्या आणि 12 वैकल्पिक सुट्ट्या निश्चित झाल्या आहेत.
 
दिल्ली आणि नवी दिल्लीतील केंद्रीय कार्यालयांमध्ये वैकल्पिक सुट्ट्यांपैकी तीन दिवस कार्मिक विभाग निवडत असून, इतर राज्यांमध्ये त्या सुट्ट्या स्थानिक प्रशासन ठरवते. कर्मचाऱ्यांना या वैकल्पिक दिवसांपैकी स्वतःच्या पसंतीने दोन दिवस सुट्टी घेण्याची परवानगी आहे. राज्यनिहाय काही तारखांमध्ये बदल होऊ शकतात, त्यामुळे स्थानिक सरकारच्या सूचनांचा संदर्भ घेणे आवश्यक राहणार आहे.
 
जानेवारी महिन्यात नववर्षानंतर मकरसंक्रांती, पोंगल आणि बसंत पंचमी हे उत्सव साजरे होत असून, 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन हा राजपत्रित सुट्टीचा दिवस आहे. फेब्रुवारीमध्ये गुरु रविदास जयंती, दयानंद सरस्वती जयंती, महाशिवरात्र आणि शिवजयंती यांचा समावेश करण्यात आला आहे.
 
मार्च हा सणांनी भरलेला महिना ठरणार असून, होळीचा दिवस अनिवार्य सुट्टी म्हणून ठरवण्यात आला आहे. त्याच महिन्यात होलिका दहन, चैत्र शुक्ल प्रतिपदा, उगाडी आणि चेटी चंद हे वैकल्पिक सण येतात. त्याचबरोबर ईद-उल-फित्र आणि रामनवमी हे दोन मोठे उत्सव राजपत्रित सुट्ट्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
 
एप्रिल महिन्यात महावीर जयंती आणि गुड फ्रायडे या महत्वाच्या तारखा निश्चित झाल्या असून, मे महिन्यात बुद्ध पौर्णिमा आणि बकरीदच्या सुट्ट्या मिळणार आहेत. 2026 साठीची ही संपूर्ण यादी जाहीर झाल्याने शासकीय कर्मचाऱ्यांना वर्षभराचे नियोजन करण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक मिळाले आहे.
Powered By Sangraha 9.0