Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यातील ओबीसी आरक्षणासंदर्भातील (OBC reservation) सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या भूमिकेमुळे हा मुद्दा पुन्हा अनिश्चिततेत ढकलला गेला असून, सरकार यावर गंभीर नसल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील महायुती सरकारने ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण मिळेल असे सांगून आश्वासने दिली होती. मात्र, आरक्षणाचा टक्का ५० टक्क्यांच्या मर्यादेपलीकडे गेलेल्या भागांत निवडणूक प्रक्रिया थांबण्याची शक्यता निर्माण झाल्याने ओबीसींचे प्रश्न आणखी बळावू शकतात, असे वडेट्टीवारांनी सांगितले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारकडून दिली जाणारी माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात तफावत दिसत असून, ओबीसी समाजाला भ्रमित केले जात आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे आरक्षण सध्या ‘निर्णयप्रलंबित’ स्थितीत गेल्याने हजारो लाभार्थ्यांची अपेक्षा पुन्हा अधांतरी राहू शकते, अशी टीकाही त्यांनी नोंदवली.