Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, मुंबईत वाढत चाललेल्या प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शहराची हवा दिवसेंदिवस दूषित होत आहे आणि त्यामागे प्रशासनातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थेचा मोठा हात असल्याचा त्यांनी आरोप केला.
ठाकरेंनी स्पष्ट केले की, मुंबईतील प्रदूषण वाढण्याचे कारण कोणताही नैसर्गिक बदल नाही. काही लोक ज्वालामुखीच्या धूरामुळे हवा खराब झाली, असा गैरसमज पसरवत असले तरी खरी कारणे भ्रष्टाचार आणि अनियोजित विकास आहेत, असेही त्यांनी म्हटले. निवडणुकीच्या काळात पैशांच्या गैरवापरामुळे, अनियोजित बांधकामामुळे आणि पर्यावरणाची हानी केल्यामुळे मुंबईच्या हवेत विषारी घटक वाढले आहेत, असा त्यांचा ठाम असा दावा होता.
आपल्या मुख्यमंत्री असताना त्यांनी आरे कारशेड प्रकल्पावर नियंत्रण ठेवले होते, असेही त्यांनी सांगितले. झाडतोड आणि नियोजनशून्य विकासामुळेच प्रदूषणाची पातळी या शहरात चिंताजनक अवस्थेत पोहोचली आहे. शिवाय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालाही विकासाच्या नावाखाली धोका निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तेथील जंगल मुंबईचे ‘फुफ्फुस’ असण्याबरोबरच प्राण्यांचेही वास्तव्य आहे, हे विसरता कामा नये, असे त्यांनी इशारा दिला.
ठाकरेंनी नाशिकमधील प्रदूषणविषयक स्थितीही चिंताजनक असल्याचे सांगितले. येत्या कुंभमेळ्याच्या आयोजनेत योग्य तयारी न केल्याचा आरोप करत त्यांनी तेथील प्रशासनावरही सवाल उठवले. लाखो भाविक आणि साधू-महात्म्यांच्या आगमनाला पालकमंत्री नियुक्त न केले जाणे आणि खर्चाच्या व्यवहारात पारदर्शकतेचा अभाव यामुळे संशय निर्माण झाला आहे.
मुंबईतील प्रदूषणाला भ्रष्टाचाराशी जोडणाऱ्या या टीकेने राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना बळ दिले आहे.