Image Source:(Internet)
मुंबई :
महाराष्ट्रातील शिक्षक संघटनांनी त्यांच्या मागण्यांकडे शासनाचा दुर्लक्ष वाढल्याने ५ डिसेंबर रोजी राज्यव्यापी संप (Strike) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या दिवशी अनेक शाळा बंद राहण्याची शक्यता असून, विद्यार्थ्यांना एक दिवसाची अचानक सुट्टी मिळू शकते.
गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने योग्य प्रतिसाद दिला नाही, असे मुख्याध्यापक संघाने स्पष्ट केले आहे. पुण्यातील एका बैठकीत या मुद्यांवर सविस्तर चर्चा केल्यानंतर संपाचा निर्णय झाला आहे.
शिक्षक संघटनेच्या प्रमुख मागण्या म्हणजे २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य न करण्याची मागणी, मार्च २०२४ मध्ये जाहीर झालेला संचमान्यता निर्णय रद्द करावा, तसेच शिक्षण सेवक योजनेत काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना नियमित वेतनमानात आणावे, अशी आहेत.
५ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्याची तयारीही जोरदार सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाला शाळा सुचारू चालवणे कठीण होऊ शकते, आणि बहुतेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जर शासनाने याबाबत लवकरच सकारात्मक पाऊल उचलले नाही, तर शिक्षक संप टळण्याची शक्यता कमी असून, विद्यार्थ्यांना एक अनपेक्षित सुट्टीचा दिवस मिळेल.