लोवी इन्स्टिट्यूट आशिया पॉवर इंडेक्स 2025 : भारत शक्तिप्रबळ ठरला तर पाकिस्तानची घसरण चिंताजनक!

    28-Nov-2025
Total Views |
 
Lowy Institute Asia Power Index 2025
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
आशियातील सामरिक ताकदीचे स्वरूप वेगाने बदलत असून यंदाच्या लोवी इन्स्टिट्यूट आशिया पॉवर इंडेक्स (Lowy Institute Asia Power Index) 2025 मध्ये भारताने आपली प्रभावी उपस्थिती ठळकपणे दाखवून दिली आहे. प्रतिष्ठित ऑस्ट्रेलियन थिंक टॅंकने जाहीर केलेल्या या अहवालात भारताला तिसरे स्थान देत, आशिया खंडातील ‘मुख्य भू-राजकीय शक्ती’ म्हणून त्याची प्रतिमा आणखी दृढ झाली आहे.
 
अहवालात आशियातील 27 देशांच्या सामरिक, आर्थिक, राजनैतिक, सांस्कृतिक प्रभावासह भविष्यातील शक्तिसामर्थ्याचा अभ्यास करण्यात आला. यात चीनची ताकद वाढत असली तरी भारताचा प्रवास सातत्यपूर्ण, स्थिर आणि अधिक व्यापक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
 
पाकिस्तानचा दबदबा संपला-
भारताच्या तुलनेत पाकिस्तानची परिस्थिती अधिकच खालावली असून तो 16 व्या क्रमांकावर घसरला आहे. आर्थिक अस्थिरता, राजकीय गोंधळ आणि क्षीण होत चाललेला आंतरराष्ट्रीय प्रभाव ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत.
 
अमेरिका अजूनही प्रथम क्रमांकावर – पण प्रभाव कमी-
इंडेक्सच्या शिखरावर अमेरिका कायम असली तरी तिचा आशिया क्षेत्रातील प्रभाव सातत्याने घटत आहे. 2018 पासून सुरू असलेल्या या क्रमवारीत यंदा अमेरिकेला सर्वात कमी गुण मिळाल्याची नोंद झाली आहे.
 
चीनचा वाढता विस्तार, तसेच अमेरिकेच्या कठोर आणि अस्पष्ट धोरणांनी या स्थितीला चालना दिल्याचे विश्लेषणात नमूद आहे.
 
भारताची उंचभरारी-
2025 च्या इंडेक्समध्ये भारताची प्रगती खालील कारणांनी अधिक ठळक दिसून येते.
 
मजबूत आर्थिक वाढ
संरक्षणव्यवस्थेतील सतत होणारा विस्तार
धोरणात्मक क्षमतेतील वाढ
प्रादेशिक आणि जागतिक उपस्थितीत होणारी मजबुती
अहवालात, भारताची कामगिरी उल्लेखनीय असली तरी राजनैतिक प्रभाव आणि आर्थिक पोहोच अधिक वाढवण्याची गरज अद्याप कायम असल्याचे नमूद केले आहे.
 
आशियात बदलत्या समीकरणांचा केंद्रबिंदू भारत-
इंडेक्सचे संपूर्ण चित्र पाहता आशियातील शक्ती-संतुलनाचा वेगाने बदलणारा स्वरूप स्पष्ट दिसत आहे. भारत आता या बदलाचा मुख्य घटक बनत असून, पुढील काही वर्षांत त्याची भूमिका आणखी निर्णायक होणार असल्याचे अहवालातून सूचित होते.