नगरपरिषदेच्या मतदानाची वेळ बदलली; मतदान सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत!

27 Nov 2025 17:44:16
 
Municipal Council voting
 Image Source:(Internet)
नागपूर :
महाराष्ट्रातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आता मतदानाची वेळ (Voting time) सकाळी 7:30 वाजता सुरू होऊन सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत असेल. निवडणूक आयोगाने संपूर्ण यंत्रणा सज्ज केली असून, या निवडणुकीत एकूण 1 कोटी 7 लाखांहून अधिक मतदार मतदान करतील.
 
मतदानासाठी आवश्यक त्या ईव्हीएम आणि इतर उपकरणांची व्यवस्था पूर्ण केली गेली आहे. मतमोजणी 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे.
 
निवडणूक आयोगाने दुबार मतदान टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली असून, मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदारांच्या नावांसमोर डबल स्टार चिन्ह ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कोणताही मतदार एकाहून अधिक ठिकाणी मतदान करू शकणार नाही.
 
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी तैनात असून, मतदान सुरळीत पार पडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण आहे.
Powered By Sangraha 9.0