हिंजवडीतील अंगणवाडीत धक्कादायक प्रकार; 20 चिमुकल्यांना खोलीत लॉक करून कार्यकर्ती बैठकला रवाना

27 Nov 2025 12:31:11
 
20 toddlers locked
 Image Source:(Internet)
पुणे :
हिंजवडी (Hinjewadi) येथील अंगणवाडी क्रमांक 3 मधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे अंगणवाडी कार्यकर्ती सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी तब्बल 20 लहान मुलांना खोलीत बंद करून बाहेर गेल्याचा प्रकार उघड झाला आहे.
 
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात चिमुकले रडत, घाबरलेले दिसत आहेत. व्हिडिओ पाहताच पालक आणि परिसरातील नागरिकांत संताप उसळला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही महिलांनी माजी सरपंचांनी बोलावलेल्या बैठकीसाठी जाण्यासाठी अंगणवाडीतली मुले आत लॉक करून ठेवली आणि जवळपास एक तासासाठी बाहेर गेल्या. चिमुकल्यांना कोणीच लक्ष देणारे नसल्याने ते भयभीत झाले होते.
 
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी ही बाब अधिकारी वर्गाच्या लक्षात आणून दिल्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यकर्ती व मदतनीस यांना परत बोलावून अंगणवाडी उघडण्याचे आदेश दिले.
 
लहान मुलांना एकटे सोडणे, तेही अंगणवाडीच्या खोलीत बंद करून ठेवणे ही गंभीर निष्काळजीपणा मानली जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0