दिल्लीचे बूट चाटत फिरणारे शिवसेनेला पुढे नेऊच शकत नाही;उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

21 Nov 2025 15:14:31
 
Uddhav Thackeray
 Image Source:(Internet)
मुंबई :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आज पुन्हा एकदा बोचरी टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी शिंदेंची थेट खिल्ली उडवत म्हटले की, “दिल्लीचे बूट चाटत फिरणाऱ्यांना मराठा म्हणणे पराकाष्ठेचा विनोद आहे. दरवेळेला मुजरे मारणाऱ्यांनी शिवसेनाप्रमुखांचे विचार कसे काय पुढे न्यायचे?”
 
ठाकरे पुढे म्हणाले, “एकेकाळी ज्यांची कुणीही नाके खुपसण्याची हिंमत करायची नाही, तेच आता दुसऱ्यांच्या ताटाखालचे मांजर बनले आहेत. मांजर कितीही पट्टे मारले तरी वाघ बनत नाही वाघ हा वाघच राहतो.”
 
भाजपवर बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले, “आम्ही भाजपचे कधी होतोच नाही. आधीचा भाजप वेगळा होता, पण आत्ताचा भाजप हा सतत आकार बदलणाऱ्या अमीबासारखा झाला आहे.”
 
कार्यकर्त्यांकडून मिळणाऱ्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना उद्धव ठाकरेंनी शिंदेंना पुन्हा एक टोकाचा टोमणा मारला. “काल दिल्लीला जाऊन जे मुजरे करून आले, ते आता कशाला शूरपणाचे ढोंग करतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
उद्धव ठाकरे यांच्या या तिखट वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरणात नवीन खळबळ माजली असून, शिंदे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0