रेशन कार्डमधून कोट्यवधी नावे वगळली; तुमचे नाव लिस्टमध्ये आहे का? कसे तपासाल, जाणून घ्या!

21 Nov 2025 11:12:21
 
ration cards
 Image Source:(Internet)
नागपूर :
देशात आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि गरजू लोकांसाठी भारत सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत मोफत आणि कमी किमतीत रेशनची सुविधा पुरवते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड (Ration cards) असणे अनिवार्य आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर अपात्र लोकांची नावे रेशन कार्डमधून काढण्यात येत आहेत.
 
अपात्र लाभार्थी बाहेर काढण्याचा सरकारचा प्रयत्न-
तपासणीदरम्यान असे समोर आले आहे की मृत व्यक्तींच्या नावावरही अनेक वर्षांपासून रेशन घेतले जात होते. त्यामुळे सरकारने पडताळणी मोहीम वाढवून, अपात्र लोकांची नावे वगळण्यास प्राधान्य दिले आहे. गेल्या काही महिन्यांत तब्बल २.२५ कोटी लोकांची नावे योजनेतून काढली गेली आहेत.
 
नावे वगळण्याची मुख्य कारणे-
फक्त सरकारी योजना फायद्यासाठी रेशन कार्ड बनवणे
मागील ६ महिन्यांपासून रेशन उचललेले न नसणे
पात्रतेच्या निकषांची पूर्तता न करणे (उदा. चारचाकी वाहन, मासिक उत्पन्न मर्यादा ओलांडणे, कंपन्यांचे संचालक असणे)
मृत्यू झालेल्या लाभार्थींची नावे
तुमचे नाव रेशन कार्ड यादीत आहे का? हे असं तपासा-
 
जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे नाव यादीतून वगळले गेले असेल, तर खालील स्टेप्सने ते सहज तपासू शकता:
 nfsa.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
‘Ration Card’ पर्याय निवडा.
‘Ration Card Details On State Portals’ या लिंकवर क्लिक करा.
आपले राज्य, जिल्हा, ब्लॉक (तालुका), आणि पंचायत निवडा.
रेशन दुकान आणि कार्डचा प्रकार (उदा. AAY/PHH) निवडा.
समोर येणाऱ्या यादीत आपले नाव शोधा.
 
जर तुमचे नाव यादीत असेल तर तुमचे रेशन कार्ड सक्रिय आहे, अन्यथा तुमची नावे योजनेतून काढण्यात आली असू शकते.
महत्त्वाची टीप-
e-KYC अपडेट न झालेल्या कार्डांना प्राथमिकता देऊन निष्क्रिय (Deactivate) केले जाईल. त्यामुळे तुमचे कार्ड सक्रिय ठेवण्यासाठी e-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे.
 
NFSA कायदा आणि त्याची व्याप्ती-
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ मध्ये संसदेने मंजूर केला असून, ग्रामीण भागातील ७५% आणि शहरी भागातील ५०% लोकांना योजनेत समाविष्ट करण्याचा उद्देश आहे. हे सुमारे ८१.३५ कोटी लोकसंख्येला फायदेशीर ठरते.
 
अंत्योदय अन्न योजना (AAY): दर महिन्याला ३५ किलो धान्य कुटुंबाला.
प्राधान्य कुटुंब योजना (PHH): दर महिन्याला प्रति व्यक्ती ५ किलो धान्य.
 
सरकारने रेशन कार्ड योजनेतून खऱ्या गरजू लोकांपर्यंतच लाभ पोहोचावा यासाठी अपात्र लोकांना यंत्रणेतून बाहेर काढण्याचा मोठा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे आपल्या नावाची तातडीने पडताळणी करा आणि आवश्यक असल्यास e-KYC प्रक्रिया पूर्ण करा.
Powered By Sangraha 9.0