पती पत्नी और पंगा’ला विजेते मिळाले; रुबिना दिलैक–अभिनव शुक्ला कपलने ट्रॉफी पटकावली!

17 Nov 2025 19:53:25
 
Rubina Dilaik-Abhinav Shukla
 Image Source:(Internet)
मुंबई :
प्रेक्षकांच्या उत्कंठेला शिगेला पोहोचवणाऱ्या ‘पती पत्नी और पंगा’ (Pati Patni Aur Panga) या लोकप्रिय कपल रिअॅलिटी शोचा भव्य समारोप पार पडला असून रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला या लाडक्या सेलिब्रिटी जोडप्याने विजेतेपदाची ट्रॉफी आपल्या नावे केली आहे.
 
ग्रँड फिनालेत अखेरची लढत दोन दिग्गज जोड्यांमध्ये रंगली होती — गुरमीत चौधरी–देबिना मुखर्जी विरुद्ध रुबिना–अभिनव. सूत्रसंचालक सोनाली बेंद्रे यांनी विजेत्यांची घोषणा करताच संपूर्ण सेटवर जल्लोषाच्या गर्जना उमटल्या.
 
सुमारे तीन महिन्यांच्या या प्रवासात छोट्या पडद्यातील अनेक परिचित चेहरे त्यांच्या पार्टनरसोबत मंच गाजवत होते. हिना खान, स्वरा भास्कर, गीता फोगट, सुदेश लाहिरी, देबिना बॅनर्जी, ईशा मालवीय, अभिषेक कुमार आणि अविका गोर यांनी या शोची रंगत वाढवली.
 
विजयी ठरल्यावर आपली भावना व्यक्त करत रुबिना–अभिनव म्हणाले,हा शो आमच्या नात्याला एक नवीन दिशा देऊन गेला. आम्ही परिपूर्ण नसू, पण एकत्र राहण्याचा आत्मविश्वास आणि एकमेकांवरील विश्वास आम्हाला येथे घेऊन आला. ही ट्रॉफी आमच्या बंधाला अधिक बळ देते.”
 
जोडप्याने प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल, शोच्या टीमच्या उत्तम समन्वयाबद्दल, तसेच कलर्स, निर्माते आणि सोनाली तसेच मुनावर यांच्याकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.या भव्य समारोपानंतर शोच्या पुढील सीझनची उत्सुकता चाहत्यांमध्ये आता आणखी वाढली आहे.
Powered By Sangraha 9.0