Image Source:(Internet)
मुंबई :
प्रवाशांनी भरलेलं मुंबईहून कोलकात्याकडे जाणारं स्पाइसजेटचं (SpiceJet) SG670 विमान रविवारी रात्री मोठ्या अडचणीत सापडलं. उड्डाणादरम्यान अचानक एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाला कोलकाता विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावं लागलं.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं. मात्र, काही मिनिटांतच पायलटला इंजिनमध्ये बिघाड जाणवला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तत्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत आपत्कालीन लँडिंगचा निर्णय घेतला.
पायलटच्या सूजबूज आणि तत्परतेमुळे विमान कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उतरलं. सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना इजा झालेली नाही.
विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, घटनेनंतर विमानाची तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली असून इंजिन निकामी होण्यामागील नेमकं कारण शोधलं जात आहे. या घटनेमुळे काही काळ विमानतळावरील हालचाल खंडित झाली होती.पायलटच्या शांततेने आणि तात्काळ निर्णयक्षमतेने शेकडो जीव वाचले. अशी प्रवाशांकडून प्रशंसा व्यक्त होत आहे.