बुटीबोरी आयटीआयमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते अल्पकालीन अभ्यासक्रमांचे ऑनलाइन उद्घाटन

09 Oct 2025 22:47:30
- विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांचा उत्साहपूर्ण सहभाग

Butibori ITIImage Source:(Internet) 
बुटीबोरी (ता. हिंगणा) :
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) बुटीबोरी येथे दिनांक ८ ऑक्टोबर रोजी मा. पंतप्रधानांच्या शुभहस्ते विविध अल्पकालीन कौशल्य विकास अभ्यासक्रमांचे ऑनलाइन उद्घाटन उत्साहात पार पडले. या विशेष प्रसंगी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि मान्यवरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
 
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. विद्या विनय हरदास उपस्थित होत्या. तसेच मिलिंद कोवे (उपसरपंच, गटग्रामपंचायत धानोली (गुमगाव)), विनय हरदास (अभियंता), उद्घाटक विश्वकर्मा लाभार्थी लिलाधर पंढरी चौधरी, प्राचार्य मुरलीधरराव गायकवाड, गटनिदेशक शैलेंद्र कुंटे आणि गटनिदेशक सुधीर कांबळे यांचीही उपस्थिती लक्षणीय ठरली.
 
या उपक्रमाचा उद्देश युवकांमध्ये कौशल्याधारित प्रशिक्षणाचा प्रसार करून त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ घडविणे हा आहे. नव्या अभ्यासक्रमांद्वारे युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, त्यांना स्वावलंबी बनण्यास मदत मिळणार आहे.
 
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी “कौशल्याद्वारे स्वावलंबन” हे ब्रीद अंगीकारून देशाच्या प्रगतीत हातभार लावण्याची शपथ घेतली.
Powered By Sangraha 9.0