Image Source:(Internet)
न्यूयॉर्क / मुंबई:
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Trump) यांचा भारतावरचा दबाव पुन्हा वाढला आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्यास भारताला थांबवण्याच्या प्रयत्नांमध्ये अमेरिकेनं आधीच 50 टक्के टॅरिफ लावला, H1B व्हिसा शुल्कही मोठ्या प्रमाणात वाढवलं, आता H1B साठी तब्बल 1 लाख डॉलर (सुमारे 88 लाख रुपये) मोजावे लागणार आहेत.
मात्र भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली नाही, त्यामुळे आता ट्रम्प यांनी आणखी एक मोठा फटका दिला आहे – अमेरिकेच्या विद्यार्थी व्हिसावर कडक निर्बंध. 2024 च्या तुलनेत यावर्षी अमेरिकेकडून जारी होणाऱ्या विद्यार्थी व्हिसामध्ये 19 टक्के घट झाली आहे.
भारतीय विद्यार्थ्यांवर सर्वात मोठा फटका
अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जगभरात सर्वाधिक आहे. मात्र यावर्षी भारतातून अमेरिकेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हिसामध्ये तब्बल 44.5 टक्क्यांची घट भासत आहे. चीनसह इतर देशांवरही फटका बसला आहे, पण भारताच्या तुलनेत त्याचा परिणाम खूपच कमी आहे.
हजारो विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द
अमेरिकेच्या परदेशी नागरिकांच्या स्थलांतरावर नियंत्रण ठेवण्याच्या योजनेतून जून महिन्यात हजारो विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या नवीन आदेशानुसार आता कोणत्याही महाविद्यालयात 5 टक्क्यांपेक्षा अधिक परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंद करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली असून, या निर्णयाचा भारतीय शिक्षण क्षेत्रावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.