Image Source:(Internet)
मुंबई:
पुणे (Pune) विमानतळाचे नाव “जगद्गुरु संत तुकाराम पुणे विमानतळ” आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाचे नाव “छत्रपती संभाजी महाराज विमानतळ” असे ठेवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगितले की या नावांना लवकरच अधिकृत मान्यता मिळेल.
पंतप्रधानांचा सकारात्मक प्रतिसाद-
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सह्याद्री अतिथिगृह येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संबंधित बैठकीत सांगितले की, नव्या विमानतळाचे नाव “लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ” ठेवण्याचा निर्णय झालाय. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देऊन प्रस्तावास मान्यता मिळवण्याची विनंती केली होती, ज्यावर पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व-
फडणवीस म्हणाले की प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर अधिकृतपणे “लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ” अशी घोषणा करण्यात येईल. हा निर्णय महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि राजकीय नेत्यांना सन्मान देण्याच्या व्यापक उपक्रमाचा भाग आहे. तसेच राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि राजकीय वारशाचा भाग म्हणून हा निर्णय घेतला जात आहे.