Image Source:(Internet)
मुंबई :
आजच्या डिजिटल युगात जवळपास सर्व कामं ऑनलाइन होत असल्याने आधार कार्ड (Aadhaar card) हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं ठरत आहे. सरकारी योजना घेणे असो किंवा बँक व्यवहार करणे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर, नागरिकांना आधार अपडेट करण्यासाठी केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत.
सध्या आधारशी संबंधित बदल करण्यासाठी नवीन शुल्क लागू करण्यात आले आहे. UIDAI ने 1 ऑक्टोबरपासून हे नवीन दर सुरू केले आहेत आणि ते 30 सप्टेंबर 2028 पर्यंत लागू राहणार आहेत. यामध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आणि बायोमेट्रिक माहिती यासारख्या बदलांसाठी शुल्क आकारले जाईल.
पूर्वी डेमोग्राफिक माहिती बदलण्यासाठी 50 आकारले जात होते, आता ते 75 झाले आहे. जर बायोमेट्रिक अपडेटसोबत हे बदल करायचे असतील, तरीही शुल्क त्याच्याच दराने राहणार आहे. फक्त बायोमेट्रिक बदलांसाठी 125 आकारले जातील. लहान मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट मोफत राहणार आहे.
ऑनलाइन ‘myAadhaar’ पोर्टलवर 14 जून 2026 पर्यंत कागदपत्र अपडेट मोफत करता येईल, मात्र त्यानंतर अपडेटसाठी एनरोलमेंट सेंटरला जावे लागेल आणि 75 शुल्क भरावे लागेल. ई-केवायसी किंवा अन्य टूल्सच्या माध्यमातून आधार प्रिंट काढल्यास पहिल्या टप्प्यात 40 आणि दुसऱ्या टप्प्यात 50 रुपये आकारले जातील. एनरोलमेंट सेंटरवरून आधार अपडेट केल्यास GST सह 700 रुपये भरावे लागणार आहे, आणि जर एकापेक्षा अधिक आधार नोंदणी करायची असेल, तर पहिल्या व्यक्तीसाठी 700 रुपये आणि नंतर प्रत्येकासाठी 350 रुपये आकारले जातील.
या नवीन शुल्कामुळे नागरिकांनी आपला आधार वेळेत आणि योग्य प्रकारे अपडेट करणे आवश्यक आहे. दिवाळी किंवा इतर महत्त्वाच्या व्यवहारांसाठी आधार कार्डचा अपडेट असणे आता अधिक गरजेचे झाले आहे.