नागपूर शीतसत्रातील कामांचे बिल प्रलंबित; कामबंद आंदोलन करणार,ठेकेदार संघाचा इशारा

29 Oct 2025 15:25:03
 
Nagpur winter season work bill pending
Image Source:(Internet) 
नागपूर :
मागील शीतकालीन अधिवेशनावेळी (Nagpur winter season) विविध विकास आणि बांधकाम कामे पूर्ण करणाऱ्या ठेकेदारांचे देयक अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही बिले न मिळाल्याने ठेकेदार संघटनेने आगामी शीतसत्रात कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
 
माहितीनुसार, मागील सत्रात महाराष्ट्र शासन व लोकनिर्माण विभागाच्या माध्यमातून ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणावर कामे करून घेण्यात आली होती. मात्र, त्या कामांचा सुमारे १२० ते १५० कोटी रुपयांचा बिल अजूनही अडकलेला आहे.
 
ठेकेदारांनी बकाया रक्कम मिळवण्यासाठी वारंवार निवेदन, मोर्चे आणि आंदोलन केले, परंतु प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद मिळाला नाही. अखेर ठेकेदार संघाने चेतावणी दिली आहे की, जर तत्काळ देयके मंजूर झाली नाहीत, तर बुधवारपासून शीतसत्रातील सर्व कामे थांबवली जातील.
 
संघटनेच्या म्हणण्यानुसार, शासनाने ठेकेदारांचा विश्वास ठेवून कामे करवून घेतली, मात्र आता देयकाच्या विलंबामुळे अनेक ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांनी ‘पहिले बकाया, मगच काम’ असा ठाम पवित्रा घेतला आहे.
Powered By Sangraha 9.0