सरकारचे ‘ऑपरेशन क्लीनअप’ सुरू,अवैध बांगलादेशींवर होणार कठोर कारवाई ; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

29 Oct 2025 15:18:35
- बनावट कागदपत्रे रद्द करण्याचे आदेश

CM FadnavisImage Source:(Internet) 
मुंबई :
महाराष्ट्रात वाढत्या अवैध बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांच्या उपस्थितीवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने निर्णायक मोहीम सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन क्लीनअप’ या नावाने ही कारवाई राबवली जात आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि संबंधित विभागांना अशा नागरिकांची काळी यादी तयार करण्याचे तसेच शासकीय कागदपत्रांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
राज्य सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, अवैधरीत्या महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. शिवाय अशा व्यक्तींबाबत मिळालेली सर्व माहिती थेट आतंकवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
 
सुरक्षा यंत्रणांच्या अहवालानुसार, आतापर्यंत राज्यात १,२७४ अवैध बांगलादेशी नागरिकांची ओळख पटली आहे. या सर्वांच्या आधार, पॅन, रेशनकार्डसह इतर ओळखपत्रांची चौकशी सुरू असून, बनावट कागदपत्रे आढळल्यास ती तत्काळ रद्द करण्यात येणार आहेत.
 
याचबरोबर, पुढे ज्या नव्या प्रकरणांची माहिती मिळेल, त्यांची नावे आणि तपशील राज्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहेत, जेणेकरून प्रत्येक जिल्हा प्रशासन सतर्क राहील.
 
फडणवीस सरकारचा संदेश ठाम आहे. “राज्यात कायद्याचे पालन करणाऱ्यांनाच राहण्याचा अधिकार असेल.ही मोहीम राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेचा पाया अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे.
Powered By Sangraha 9.0