ट्रम्प यांचा नवीन टॅरिफ दहाका, 25% शुल्क लावले, कोणत्या उत्पादनांवर परिणाम?

    19-Oct-2025
Total Views |

Trump new tariff hikeImage Source:(Internet) 
मुंबई :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Trump) यांनी पुन्हा एकदा नवीन टॅरिफ घोषणा केली आहे. 1 नोव्हेंबरपासून मध्यम आणि जड ट्रक्स तसेच त्यांचे पार्ट्स आयात करताना २५ टक्के टॅरिफ लागू होणार आहे. यासोबतच बसेसवर १० टक्के टॅरिफ लागू होईल. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आला आहे आणि उद्देश आहे की जास्तीत जास्त वाहन उत्पादन अमेरिकेतच होईल.
 
हा निर्णय मेक्सिकोसाठी मोठा झटका ठरणार आहे, कारण मेक्सिकोमधून अमेरिकेला मुख्यत्वेकरून मध्यम आणि जड ट्रक्स पाठवले जातात. या टॅरिफच्या यादीत ३ ते ८ श्रेणीचे ट्रक्स येतात, ज्यामध्ये मोठे पिक-अप ट्रक, मूव्हिंग ट्रक, कार्गो ट्रक, डंप ट्रक आणि १८ चाकी ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. ट्रम्पच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय अमेरिकन ट्रक उत्पादक कंपन्यांना परदेशी स्पर्धकांपासून संरक्षण देण्यासाठी घेण्यात आला आहे.
 
या टॅरिफमुळे पीटरबिल्ट, केनवर्थ, डेमलर आणि फ्रेटलाइनर यांसारख्या अमेरिकन कंपन्यांना फायदा होईल. मात्र, अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने ट्रम्प यांना यावर टाळेबंदी करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यतः मेक्सिको, कॅनडा, जपान, जर्मनी आणि फिनलँडमधून हे ट्रक्स आयात केले जातात, जे अमेरिका चे विश्वासू भागीदार आहेत आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक नाहीत.
 
याशिवाय, या टॅरिफमुळे जीएम, फोर्ड, टोयोटा, स्टेलंटिस, होंडा, टेस्ला आणि इतर वाहन कंपन्यांना आधी आयात केलेल्या ऑटो पार्ट्सवर आर्थिक सवलत मिळणार आहे.
 
भारतावर अतिरिक्त टॅरिफ
अमेरिकेच्या America First धोरणाअंतर्गत, ट्रम्प यांनी अनेक देशांतून आयात होणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ लावले आहेत. सध्या भारतीय वस्तूंवर ५०% टॅरिफ आहे. यामुळे अमेरिकेत भारतीय वस्तू महागल्या आहेत आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर दबाव येऊ शकतो. विशेष म्हणजे, भारत रशियाकडून तेल आयात करतो म्हणून भारतावर अतिरिक्त २५% टॅरिफ लावला आहे.
ट्रम्पचा उद्देश अमेरिकेत उत्पादन वाढवणे हा आहे, पण याचे परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठ्या प्रमाणात पडणार आहेत.