वसुबारस 17 ऑक्टोबरपासून: दिवाळीची पहिली सुरुवात, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि गायीच्या पूजेचे महत्व

16 Oct 2025 20:07:27
 
Vasubaras
 Image Source:(Internet)
मुंबई:
दिवाळी (Diwali) हा प्रकाश, आनंद आणि उत्साह घेऊन येणारा सण आहे. पाच दिवसीय महापर्वात पहिले पर्व म्हणजे वसुबारस, जे गावात आणि शहरात वेगवेगळ्या रीतीने साजरे केले जाते. शेतकऱ्यांच्या घरात या दिवशी गायींची पूजा होते, तर शहरांमध्ये वासराच्या मूर्तीस मान दिला जातो.

वसुबारस कधी आहे?
हिंदू पंचांगानुसार वसुबारस आश्विन कृष्ण द्वादशीला साजरा केला जातो. यंदा हा सण 17 ऑक्टोबर, शुक्रवार रोजी आहे.
द्वादशी तिथी सुरू: 17 ऑक्टोबर, सकाळी 11:12
द्वादशी तिथी संपणे: 18 ऑक्टोबर, दुपारी 12:18
प्रदोषकाल: दुपारी 04:14 ते संध्याकाळी 07:43
 
वसुबारस का साजरा करावा?
गायीला भारतीय परंपरेत अत्यंत पवित्र मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये कोटीदेव वास करतात. श्रीकृष्णाने स्वतःला गोपाल म्हटले आणि राजा दिलीपही गायीची सेवा करून तिचा आदर केला. शास्त्रानुसार गायीपासून मिळणाऱ्या पाच पदार्थांना (दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र) विशेष महत्त्व आहे.

कोणती गायी पूजावी?
वसुबारसच्या दिवशी घरात लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून सवत्स धेनु किंवा घरातील गायीची पूजा केली जाते. गावात लोक गायीला पुरणपोळीचा नैवेद्य देतात. स्त्रिया अनेक ठिकाणी उपवास करतात.
 
वसुबारसची पूजा कशी करावी?
घराच्या अंगणात रांगोळी काढा.
घरातील गायी किंवा वासरूंची स्वच्छता करा व पूजा करा.
शहरात वासराच्या मूर्तीला अभिषेक करा आणि नवीन वस्त्र घाला.
गहू व मूग खाणे टाळावे; स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारच्या शेंगांची भाजी करून उपवास संपवतात.
घराच्या अंगणात आणि तुळशीच्या जवळ दिवे लावा, शेतात भरपूर उत्पादन व्हावे अशी प्रार्थना करा.
 
या दिवशी टाळावे-
गहू व मूग खाणे
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ न खाणे
तळलेले किंवा तव्यावरील पदार्थ न खाणे
 
या दिवशी करावे-
रांगोळी काढून दिवाळीचा आरंभ करणे
गायीला पुरण-वरनाचा नैवेद्य देणे
घरात व परिसरात दिव्यांची रोषणाई करणे
वसुबारसच्या दिवशी गायीच्या पूजेनं घरात समृद्धी, आरोग्य आणि सुख येते असा विश्वास आहे.
Powered By Sangraha 9.0