Image Source:(Internet)
मुंबई:
हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री स्मृती इराणी (Smriti Irani) पुन्हा चर्चेत आहे. अभिनय क्षेत्रात कमबॅक करताना त्यांनी अभिनेत्री दीपिका पदुकोण च्या कामाच्या निर्णयावर आपले मत मांडले.
दीपिकाने या वर्षी मुलगी झाल्यानंतर आपली कामाची वेळ ८ तासांपुरती मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे तिला काही कामांमध्ये अडचणी आल्या, जसे की संदीप रेड्डी वांगासोबतच्या ‘स्पिरिट’ चित्रपटात काम करता आले नाही आणि काही प्रकल्पातून माघार घ्यावी लागली.
स्मृती इराणी म्हणाल्या, “एक कलाकार म्हणून मला माझी जबाबदारी समजते. मी दोन वेळा गरोदर असतानाही काम केले आहे आणि माझ्या निर्मात्यांना यश मिळावे यासाठी प्रयत्नशील राहिले. जर मी माझ्या कामात सातत्याने पाठिंबा दिला नाही, तर अनेक कुटुंबांवर परिणाम होतो. त्यामुळे आता मी माझ्या कामाकडे आणि जबाबदारीकडे वेगळ्या दृष्टीने पाहते.”
स्मृती यांनी पुढे सांगितले की, ८ तास काम करण्याचा निर्णय वैयक्तिक आहे आणि इंडस्ट्रीमध्ये सर्जनशीलतेबरोबरच मार्केट व्हॅल्यूकडे देखील लक्ष दिले पाहिजे.