Image Source:(Internet)
मुंबई:
सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस (Fadnavis) हे भाजपाचे केंद्रीय नेतृत्वातील एक महत्त्वाचे नेते आहेत. पक्षाच्या निर्णयांमध्ये त्यांचे महाराष्ट्रात मोठे वजन आहे, आणि निवडणुकीत दिलेल्या योगदानामुळे दिल्लीतही त्यांना मान्यता आहे. सध्या देशभरात बिहार विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे, आणि या निवडणुकीत भाजपाने युतीत नितीश कुमार यांना समर्थन देत जोरदार भूमिका बजावली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीसांना दिल्लीतील पक्षनेत्यांकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
फडणवीसांची नेमकी जबाबदारी काय?
बिहारमध्ये राजकीय वातावरण खूपच तापलेले आहे. प्रमुख पक्ष आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत, आणि प्रचाराची शर्यत सुरु आहे. भाजपाने बिहार निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नावही समाविष्ट आहे. म्हणजेच आता फडणवीस बिहारमध्ये पक्षाचा प्रचार करणार आहेत, आणि युतीत सहभागी उमेदवारांना त्यांच्या प्रचारसभांद्वारे मदत करतील.
भाजपाच्या स्टार प्रचारक यादीत एकूण ४० नेत्यांचा समावेश आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय नेते अमित शाह, नितिन गडकरी, शिवराजसिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, स्मृती इराणी, केशव प्रसाद मौर्य, मनोज तिवारी, रवि किशन आदी प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राचे नेते बिहारमध्ये सक्रिय-
महाराष्ट्रातून फडणवीसासोबतच विनोद तावडे यांचाही प्रचारक म्हणून समावेश आहे. काही दिवसांत फडणवीस बिहारच्या विविध भागांत प्रचारसभेत सहभागी होताना दिसतील. या निर्णयामुळे फडणवीसाची भूमिका फक्त महाराष्ट्रपुरती मर्यादित राहणार नाही, तर राष्ट्रीय स्तरावर पक्षासाठी निर्णायक भूमिका बजावण्याची संधी देखील मिळणार आहे.दिल्लीतून फडणवीसांवर दिलेली ही जबाबदारी त्यांच्या राजकीय साखळीत आणखी उंचीची ठरणार आहे, आणि बिहार निवडणुकीतील भाजपाच्या यशासाठी त्यांचा प्रचार निर्णायक ठरू शकतो.