साजिद खानचा धक्कादायक खुलासा; ३५० महिलांसोबत नात्यात राहिल्याचा दावा

14 Oct 2025 14:47:49
 
Sajid Khan
 Image Source:(Internet)
मुंबई :
बॉलिवूडमधील चर्चित दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) पुन्हा एकदा मीडियाच्या प्रकाशात आला आहे. एका अलीकडील मुलाखतीत त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. साजिदच्या म्हणण्यानुसार, तो आतापर्यंत जवळपास ३५० महिलांसोबत नात्यात राहिला आहे. याशिवाय, १३ वर्षांपूर्वी अभिनेत्री गौहर खानसोबत असलेल्या नात्याबद्दलही त्याने माहिती दिली.
 
साजिद आणि गौहर खानचे संबंध-
२०१८ मध्ये बॉलिवूडमध्ये ‘मी टू’ आंदोलनाने खळबळ उडवली होती. अनेक कलाकारांवर आणि दिग्दर्शकांवर गंभीर आरोप समोर आले होते. त्यात साजिद खानही चर्चेत होता. त्याच्यावर अभिनेत्रींचे शोषण केल्याचे आरोप करण्यात आले होते.
 
साजिदचा वैयक्तिक जीवन हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्याचं नाव अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससोबत जोडण्यात आलं, पण याआधीच तो गौहर खानला डेट करत होता. त्यांचा साखरपुडा होण्याची चर्चा होती, पण नातं फार काळ टिकले नाही.
 
मुलाखतीत साजिद म्हणाला,आम्ही एक वर्ष एकत्र होतो. ती खूप चांगली आहे. सार्वजनिकरित्या नाव घेतल्याशिवाय मला बोलायला आवडत नाही, पण आमच्या नात्याबद्दल आधीच चर्चे झाली असल्यामुळे मला काही हरकत नाही. मीडियात आमच्या साखरपुड्याची चर्चा देखील झाली होती."
 
तो पुढे म्हणाला,मी आतापर्यंत ३५० महिलांसोबत राहिलो आहे. काही आजही मला आठवतात, तर काही माझ्याबद्दल नकारात्मक बोलत असतील.
Powered By Sangraha 9.0