नागपूरच्या मनीष नगरमध्ये घरफोडी; चोरट्यांनी रोख रक्कमेसह दागिने उडविले!

    14-Oct-2025
Total Views |
 
Burglary in Manish Nagar Nagpur
 Image Source:(Internet)
नागपूर:
मनीष नगर (Manish Nagar) येथील संताजी सोसायटीमध्ये घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात चोरट्यांनी घराची खिडकी उचकवून आत प्रवेश करत मोठी चोरी केली आहे.
 
तक्रारदार कुनाल अरविंद ठाकूर (वय 21) हे प्लॉट क्र. 69 येथे भाड्याने राहतात. 12 ऑक्टोबरच्या रात्री ते आपल्या कुटुंबासह मूळगावी तूमसर येथे गेले होते. दरम्यान, रात्री 9 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 वाजेपर्यंतच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराची खिडकी वाकवून घरात प्रवेश केला आणि घरातील रोख 95 हजार रुपये, चांदीचे दागिने आणि दोन DVR युनिट्स असा एकूण सुमारे 1 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
 
या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305(A) आणि 331(4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे.