सलमानसोबत राहणाऱ्यांना इंडस्ट्रीत कोणताही त्रास होत नाही; 'या' अभिनेत्रीचा खुलासा

13 Oct 2025 16:31:01
 
Salman
 Image Source:(Internet)
मुंबई :
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान (Salman) खान कायमच चर्चेच्या भोवऱ्यात असतो. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्री एली अवरामने सलमान खानविषयी खुलासा केला. तिने सांगितले की, सलमानमुळे तिला इंडस्ट्रीत कधीही गैरवर्तनाचा सामना करावा लागला नाही.
 
एली अवराम म्हणाली, “सलमानसोबत राहणाऱ्यांना इंडस्ट्रीत कोणताही त्रास होत नाही. खरं सांगायचं तर सलमानमुळे माझ्यावर कुणीही चुकीचा वागत नाही.” तिने पुढे सांगितले की, सलमान आपल्या ओळखीतील लोकांची काळजी घेतो आणि कधीही विसरत नाही. “अनेक वर्षांनी गणपतीत भेटलो, तरी तो मला ओळखला आणि गप्पा मारल्या,” तिने नमूद केले.
 
एलीने सलमानला तिच्या आयुष्यात ‘देवदूतासारखा’ म्हटले. ती म्हणाली, “तो खूप मदत करणारा आणि संवेदनशील आहे. इंडस्ट्रीतील मुलींना अनेकदा वाईट अनुभव येतात, पण सलमानमुळे लोक घाबरतात आणि कोणीही गैरवर्तन करण्याचे धाडस करत नाही.”
 
एली अवराम ‘मिकी व्हायरस’, ‘मलंग’ आणि ‘गुडबाय’सारख्या चित्रपटांत झळकली आहे. बॉलिवूडमध्ये स्थिर राहण्यासाठी तिला खूप मेहनत करावी लागली. “मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करते, मदत कधीच मागत नाही,” तिने सांगितले.
 
या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर सलमानच्या माणुसकीची आणि त्याच्या स्वभावाची चाहत्यांनी प्रशंसा केली आहे.
Powered By Sangraha 9.0