Amche Bappa 2024: गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पांसाठी बनवा खास पदार्थ

    07-Sep-2024
Total Views |
special dishes for Ganesha Bappa
 
एबी न्यूज नेटवर्क :
गणेशोत्सव हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. आपल्या सर्वांचे लाडकी गणपती बाप्पा आज घराघरात विराजमान होणार आहे. या दहा दिवसांत अनेक ठिकाणी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी केली जाते. गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाचा प्रसादही खास असतो. त्यामुळे अनेकदा गणपतीचे आवडते पदार्थ बनविले जातात. गणेशोत्सवात बाप्पाला प्रसाद म्हणून काय काय ठेवता येईल, हे आज आपण पाहूया.
 
 
special dishes for Ganesha Bappa
 
मोदक :
गणेशाची आराधना करताना भक्त त्यांना मोदक नक्कीच अर्पण करतात. कारण आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वाधिक आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक. बाजारात तुम्हाला सामान्य मोदकांसह इतर अनेक प्रकारचे मोदक मिळतील, परंतु श्रीगणेशाचे सर्वात आवडते मोदक आहे पारंपरिक मोदक. गणपतीसाठी तुम्ही स्वतः मोदक तयार करू शकता. मोदक बनवायला खूप सोपे असून त्याची चवही उत्तम लागते.
special dishes for Ganesha Bappa 
मोतीचूर लाडू :
बाप्पाच्या स्वागतासाठी त्याच्या आवडीचे पदार्थ तयार करून त्याला अर्पण केले जातात. तुम्हीही गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच मोतीचूर लाडू बनवू शकता. बाजारात तयार मोतीचूर लाडू मिळतील, पण घरीच तयार केले तर त्याची चव आणखी चांगली लागेल.
special dishes for Ganesha Bappa
 
पेढा :
पेढा हे कंडेन्स्ड दूध किंवा खव्यापासून बनवलेले समृद्ध, मलाईयुक्त गोड पदार्थ आहे. ज्याला वेलची, काजू, बदाम, पिस्ताने सजविले जाते. त्याची गुळगुळीत पोत आणि गोड, सुगंधी चव गणेश चतुर्थीसह इतर सणाच्या प्रसंगी वेगळीच चव आणते.
special dishes for Ganesha Bappa
 
करंजी :
सुख-समृद्धी आणि वैभावाचे प्रतीक असलेली करंजी पूजेच्या नैवेद्यासाठी बनवली जाते. घरात आनंदाचा सण असेल तर करंजीचा मान वेगळाच असतो. करंजीची पाती रवा किंवा मैद्याची बनवली जाते. फराळातला करंजी हा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो. संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या प्रकारे करंजी तयार केली जाते. तुम्हीसुद्धा करंजीचा नैवेद्य करून बाप्पांना आनंदी करू शकता.
special dishes for Ganesha Bappa
 
बर्फी: 
दुधाची बर्फी, नारळ बर्फी आणि बेसन बर्फीसह अनेक प्रकारच्या बर्फी बनवता येते. बर्फी ही एक समृद्ध, गोड मिठाई आहे, जी गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून उत्तम पर्याय ठरू शकते.