वर्धा रोडवर भीषण अपघातात एका मृत्यू

    30-Sep-2024
Total Views |

One dies in horrific accident on Wardha Road
 
 
नागपूर : 
वर्धा मार्गावरील जामठा टी पॉइंट येथे आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नागपूरच्या दिशेने येणाऱ्या मिक्सर ट्रकने समोरून येणाऱ्या कंटेनरला धडक दिली, त्यानंतर मिक्सरने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला धडक दिली. या अपघातात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
 
पोलिसांनी सांगितले की, रामलाल गोपीलाल चव्हाण (वय 57, रा. गुढा, भिलवाडा, राजस्थान) असे मृताचे नाव आहे. तो या ट्रकचा चालक होता.फिर्यादी कार चालक स्वप्नील हलके (रा. मानेवाडा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
 
स्वप्नील त्याच्या कारने जामठा चौकात आला आणि वर्धा लेनवरून नागपूर रोडला यू-टर्न घेण्यासाठी थांबला. या चौकात येताच नागपूरच्या दिशेने येणाऱ्या लेनमधून कंटेनरच्या पाठीमागून एक मिक्सर वाहन भरधाव वेगात आले आणि कंटेनरला जोराची धडक बसली आणि वर्धा लेनवर उभ्या असलेल्या फिर्यादीच्या गाडीच्या पुढील भागालाही ही धडक बसली. या अपघातात कंटेनर चालकासह अन्य एक जण जखमी झाला आहे. पहाटेच्या सुमारास या मार्गावरून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी पोलिसांना माहिती दिली आणि दोन्ही जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
माहिती मिळताच हिंगणा पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रशांत ठवरे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघ व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सर्व वाहने रस्त्याच्या कडेला हलवण्यात आली आणि वाहतूक सुरळीत सुरू झाली.