नागपूरच्या 'एम्स' रुग्णालयात पॉर्न दाखवून रॅगिंग; दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

30 Sep 2024 18:51:03

Case registered against 2 students for showing porn in Nagpur AIIMS
 (Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
मध्य भारतातील प्रसिद्ध 'एम्स' वैद्यकीय संस्थेच्या दोन विद्यार्थ्यांविरोधात एका ज्युनियरची रॅगिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एम्समध्ये खळबळ उडाली आहे. या दोन विद्यार्थ्यांनी ज्युनिअर विद्यार्थ्याला अश्लील फिल्म दाखवून त्याचे कपडे काढून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शेवटी घाबरलेल्या विद्यार्थ्याने आवाज करून स्वतःला वाचवले. याप्रकरणी सोनेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
आरोपी विद्यार्थ्यांमध्ये दिव्यांशु राठोड आणि अमन अहलावत यांचा समावेश आहे. हे दोघेही B.Sc (MLT) चे विद्यार्थी आहेत. 21 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वाजता आरोपीने पीडित विद्यार्थीला केशव वसतिगृहाच्या खोलीत बोलावले होते. त्यानंतर पीडित विद्यार्थिला एका खोलीत बंद केल्यानंतर दोघांनी त्याला पहिल्या 5 पॉर्नस्टारची नावे विचारली आणि नंतर गर्भधारणेशी संबंधित प्रश्न विचारले. यानंतर त्याला अश्लील फिल्म दाखवून त्याचे कपडे काढण्यास लावले. घाबरलेल्या विद्यार्थाने आरडाओरडा सुरु केला. हा आवाज ऐकून वसतिगृहातील इतर विद्यार्थी धावून आले. मात्र त्यानंतरही रात्री उशिरा आरोपी विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थीला तक्रार न करण्याची धमकी दिली. यामुळे पीडित विद्यार्थी चांगलाच घाबरला होता. त्याने दोन दिवसांनी एम्सच्या अँटी रॅगिंग समितीकडे तक्रार केली. समितीने हे प्रकरण गांभीर्याने घेत चौकशी सुरू केली.
 
च्या समितीने वसतिगृहातील 13 विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले. या तपासात पीडित विद्यार्थाच्या रॅगिंगचे प्रकरण समोर आले. अखेर समितीने नियमानुसार दोन्ही विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. यानंतर अँटी रॅगिंग समितीचे सदस्य व प्राध्यापक सचिन रमेश चौधरी यांनी सोनेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपी विद्यार्थ्यांविरुद्ध महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंध कायदा आणि भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 127 (2), 351 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Powered By Sangraha 9.0