MPSC परीक्षेत 'महाज्योती’च्या 151 विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

    30-Sep-2024
Total Views |
151 students of Mahajyoti got success in MPSC exam
(Image Source : Internet/ Representative) 
एबी न्यूज नेटवर्क
मूल्याधिष्ठित शिक्षणाचा प्रसार करण्याच्या हेतूने राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर ही राज्यातील ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून दर्जेदार प्रशिक्षण तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे.
 
महाज्योती मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षा पूर्व प्रशिक्षण विद्यार्थ्याना देण्यात आले होते. दर्जेदार प्रशिक्षणाचीच फलश्रृती म्हणजे आज एमपीएससी परीक्षेमध्ये महाज्योतीचे 151 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. त्यापैकी विनीत विक्रांत शिर्के यांची उपजिल्हाधिकारी या पदा करिता निवड झालेली आहे. इतर मागास वर्ग या प्रवर्गातून यांचा प्रथम क्रमांक आलेला असून राज्यात सातवा क्रमांक आलेला आहे. तसेच ओबीसी प्रर्वगात राज्यात मुलीमध्ये प्रथम पटकाविणाऱ्या वैष्णवी हरिभाऊ बावस्कार हिने घवघवीत यश प्राप्त केले.
 
विद्यार्थांना उत्तम प्रशिक्षण दिल्यामुळेच ओबीसी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिली. या दोन्ही विद्यार्थ्यानी आपल्या यशाचे श्रेय आपल्या पालकाला तसेच महाज्योतीला दिले आहे. महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी सांगितले की, महाज्योतीचे 151 विद्यार्थ्यांमध्ये 98 इतर मागास वर्ग, 49 विमुक्त जाती - जमाती तसेच 4 विशेष मागास प्रवर्गीय प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश आहे. त्यापैकी विनीत विक्रांत शिर्के यांची उपजिल्हाधिकारी या पदाकरिता निवड झालेली. तसेच ओबीसी प्रर्वगात राज्यात मुलीमध्ये अव्वल क्रमांक वैष्णवी हरिभाऊ बावस्कार यांनी पटकाविला. स्पर्धा परीक्षा ही केवळ ज्ञानाची परीक्षा नसून यात अभ्यासात घेतलेली मेहनत, जिद्द, आणि चिकाटी तसेच तुमची शिस्त यांच्यातून मिळालेले फळ म्हणजेच विद्यार्थ्यांचे यश असते. प्राविण्यप्राप्त सर्व विद्यार्थ्यानचे मनपूर्वक अभिनंदन तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिल्या.
 
उत्तम दर्जाच्या प्रशिक्षणाची फलश्रृती ‘एमपीएससी’चा निकाल : मंत्री अतुल सावे
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, तथा अध्यक्ष महाज्योती, नागपूर अतुल सावे यांनी सांगितले की, महाज्येाती मार्फत देण्यात येणाऱ्या उत्तम दर्जाच्या प्रशिक्षणाची हा निकाल फलश्रृती आहे. दिवसेंदिवस महाज्योतीचे विद्यार्थी स्पर्धा परिक्षांमध्ये घवघवीत यश मिळवित आहे. त्यामुळेच आज विनीत विक्रांत शिर्के आणि वैष्णवी हरिभाऊ बावस्कार या दोन्ही विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
 
महाज्योतीच्या विद्यावेतनातून मिळाली प्रशिक्षणास मदत : विनीत शिक्रे
मी विनीत शिक्रे कोल्हापूर जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसेवा 2023 परीक्षेतून माझी OBC प्रवर्गातून पहिल्या क्रमांकाने उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झाली आहे. मला महाज्योतीच्या योजनेचा विद्यावेतन व प्रशिक्षणाच्या माध्यमातून खूप फायदा झाला. आर्थिक भार कमी होऊन मी चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकलो तसेच माझ्या यशाचे श्रेय माझ्या पालकांनी वेळोवेळी दिलेला पाठिंबा व महाज्योती राभविलेले परीक्षा पूर्व प्रशिक्षण व अर्थसहाय्य यांना देतो.