- अपघात सीसीटीव्ही कॅमेरात घटना कैद
अमरावती:
अमरावती (Amravati) जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरालगत ट्रकने दुचाकी जोरदार धडक दिली. हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. ही घटना देवगावजवळ दोन दिवसांपूर्वी घडली असून, यातील जखमींना धामणगाव रेल्वे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एक दुचाकी चालक ट्रकच्या मागे जात असतांना अचानक दुचाकीस्वाराने आपले वाहन अचानक वळविले आणि त्याचवेळी समोरून येणार्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील दोघेही दुचाकी सह लांब फेकल्या गेले. ही संपूर्ण घटना धामणगाव रेल्वे शहरातील बायपास रोडवरील पेट्रोल पंपावर असणार्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या अपघातात दोन्ही दुचाकी चालक गंभीर जखमी झाले असून स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. पुढील तपास धामणगाव रेल्वे पोलीस करीत आहे.