(Image Source : Internet)
एबी न्यूज नेटवर्क:
व्हिटॅमिन बी 12 हे एक आवश्यक जीवनसत्व असून शरीरात महत्त्वाची भूमिका बजावते. व्हिटॅमिन बी 12 लाल रक्तपेशी आणि डीएनएच्या निर्मितीमध्ये उपयुक्त आहे. हे जीवनसत्व आतडे आणि त्वचेच्या पेशी निरोगी ठेवण्यात मदत करते. तसेच चरबी, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सच्या निर्मितीमध्ये देखील उपयुक्त ठरते. याशिवाय व्हिटॅमिन बी 12 हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे थकवा, विस्मरण, मूड स्विंग, अस्वस्थता, बधीरपणा, मुंग्या येणे, त्वचा पिवळी पडणे, केस पातळ होणे इत्यादी अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. ही लक्षणे टाळण्यासाठी आहारात व्हिटॅमिन बी 12 पुरेशा प्रमाणात समाविष्ट करणे महत्वाचे आहे. असे म्हणतात की मांसाहारी पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी 12 भरपूर प्रमाणात असते. पण जे लोक मांसाहारी अन्न खात नाही, त्यांना अश्यावेळी मोठा प्रश्न पडतो की शारीसाठी अत्यावश्यक असलेले व्हिटॅमिन बी12 कसे घ्यावे. पण अनेक शाकाहारी लोकांना माहिती नसेल की ड्रायफ्रुट्समध्ये देखील मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी12 आढळून येते.
ड्रायफ्रुट्स प्रत्येकजण आवडीने खातात. म्हणूनच, व्हिटॅमिन बी 12 समृद्ध ड्राय फ्रूट्स खाणे हा शाकाहारी लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. चला जाणून घेऊया कोणते ड्रायफ्रूट्स व्हिटॅमिन बी 12 ने समृद्ध आहेत.
मनुका :
मनुका म्हणजे किसमिस सुद्धा व्हिटॅमिन बी 12 चे चांगले स्त्रोत आहेत. रात्री मनुका भिजवून सकाळी खाल्ल्यास त्याचा चांगला फायदा होतो. किसमिस इतर ड्राट फ्रूटच्या तुलनेत स्वस्तसुद्धा असतात. मनुका खाल्यामुळे हाडे अधिक मजबूत होतात. मनुका हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचा एक उत्तम स्रोत आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 समाविष्ट आहे. म्हणूनच अनेक पदार्थांमध्ये त्याचा समावेश केला जातो. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी मनुका शिरा, दही किंवा इतर पदार्थांमध्ये समाविष्ट करू शकता.
खजूर :
खजूर, नैसर्गिक साखरेने समृद्ध, व्हिटॅमिन बी 12 चा चांगला स्रोत देखील आहे. इतर अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजेदेखील यामध्ये आढळतात, त्यामुळे खजूर खाणे फायदेशीर ठरू शकते. खजूरमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. हा पदार्थ चविष्टसुद्धा आहे. खजूर विविध पदार्थांमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो. उपवास असताना अनेकवेळा खजूरचे सेवन केले जाते.
काजू :
काजू हे व्हिटॅमिन बी 12 चे मौल्यवान स्त्रोत आहेत. हे बऱ्याचदा स्नॅक म्हणूनही खाल्ले जाते. तसेच विविध पदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो. काजूचा वापर केल्यामुळे तुमचा आहार एक स्वादिष्ट आणि पौष्टिकसुद्धा होतो.
पिस्ता :
पिस्ता केवळ स्वादिष्टच नाहीत तर त्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 चे प्रमाणदेखील चांगले आहे. पिस्ता आपल्या शारीसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. निरोगी प्रौढ व्यक्तीने दररोज किमान ३ ते ४ पिस्ते खावेत. पिस्ता खाल्ल्याने एनर्जी लेव्हल वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हाडे आणि दात मजबूत होतात.
बदाम :
बदामात व्हिटॅमिन बी 12 चे लक्षणीय प्रमाण आढळून येते. बदाम खाण्याचे अनेक फायदे आरोग्याला होतात. हृदयाशी संबंधित आजारांमध्ये बदाम फायदेशीर ठरते. रक्तातील साखरेची पातळी कमी करणे, रक्तदाब कमी करणे आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे यांचा समावेश होतो.
भोपळ्याच्या बिया :
भोपळ्याच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 असते. तसेच इतर आवश्यक पोषक तत्वांचाही समावेश असतो. भोपळ्याच्या बिया प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे व्हिटॅमिन ई, बी जीवनसत्त्वे आणि खनिजे, मॅग्नेशियम, जस्त आणि लोहाने समृद्ध असतात. त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोस्टेरॉलदेखील असतात.