अभिनेत्री आदिती राव (Aditi Rao Hydari) हैदरीचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत, तिला वेगळ्या ओळखीची गरज नाही. आदिती राव हैदरी केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. अशातच आदिती नुकतीच बॉयफ्रेंड सिद्धार्थसोबत लग्नबंधनात अडकली असून त्यांनी स्वतः चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. अदिती आणि सिद्धार्थने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. दरम्यान मार्च महिन्यात आदिती आणि सिद्धार्थ यांचा साखरपुडा झाला होता.
अदितीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटोज शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'तू माझा सूर्य, माझा चंद्र आणि माझे सर्व तारे आहेस... अनंतकाळासाठी आपण एकमेकांचे झालोत... असेच हसत राहू, कधीही मोठे न होण्यासाठी... कायमसाठी प्रेम, प्रकाश आणि जादू. मिसेस आणि मिस्टर अदू-सिद्धू.'
या जोडप्याने दक्षिण भारतीय लग्नातील मंत्रमुग्ध करणारे फोटोज सोशल मीडियावर शेयर केले आहेत. अदिती ही सोनेरी तर सिद्धार्थ पांढऱ्या रंगाच्या पेहरावात दिसत आहे.
या जोडप्याने पारंपारिक पोशाख घातलेले फोटो शेअर करताना 'मिसेस आणि मिस्टर अदू-सिद्धू' असे लिहिले आहे. तसेच त्यांनी अतिशय साधेपणाने लग्नसोहळा पार पाडला आहे. पारंपारिक सोन्याच्या दागिन्यांसह साडीत अदिती खूप सुंदर दिसत आहे.
या जोडप्याने एक साधी दक्षिण भारतीय शैलीतील लग्नाची परंपरा निवडली आणि वानपर्थी येथील 400 वर्षे जुन्या मंदिरात लग्नगाठ बांधली. अदिती आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाला त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीयांनी हजेरी लावली होती.