ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी बदलली; मुंबईत १८ ला असेल सुट्टी

14 Sep 2024 14:15:37
 
Maharashtra govt shifts Eid e Milad holiday in Mumbai
(Image Source : Internet/ Representative) 
 
एबी न्यूज नेटवर्क :
ईद-ए-मिलादच्या सार्वजनिक सुट्टीत बदल करण्यात आला आहे. ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर असून आता १८ सप्टेंबर रोजी असणार आहे.
 
ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार १८ सप्टेंबर रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे.
 
त्यामुळे मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात सोमवार १६ सप्टेंबर घोषित केलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार १८ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती राज्य शासनाने निर्गमित केलेल्या अधिसूचनेत सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यां जाहीर केल्या आहेत.
 
मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार १६ सप्टेंबर रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार, १८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे सामान्य प्रशासन विभागाने इतर जिल्हाधिकारी कार्यालयांना कळविले आहे.
Powered By Sangraha 9.0