(Image Source : X/ Screengrab)
एबी न्यूज नेटवर्क :
उत्तराखंडमधील केदारनाथ महामार्गावर सोनप्रयाग-मुंकटिया रुद्रप्रयाग दरम्यान दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत ५ भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. इतर अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेला माहितीनुसार, सध्या स्थानिक प्रशासन, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथकाद्वारे तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी शोक व्यक्त केला
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेची दु:खद बातमी मिळताच शोक व्यक्त केला आहे. त्यांनी 'X' वर लिहिले की, 'सोनप्रयाग-मुंकटिया (रुद्रप्रयाग) दरम्यान भूस्खलनामुळे अनेक प्रवासी गाडले गेले आहेत.
मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मी बाबा केदार यांच्याकडे प्रार्थना करतो. माझ्या शोकसंवेदना शोकाकुल कुटुंबाप्रती आहेत. बचावकार्य अजूनही सुरू असून सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे.'