Hurun Rich List 2024: शाहरुख खान बनला बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी

    30-Aug-2024
Total Views |
Hurun Rich List 2024
 
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान याने जगभरात आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि कार्याने प्रसिद्धी मिळवली आहे. किंग खान आपल्या चित्रपटांसोबतच व्यवसायातही हात आजमावण्यास मागेपुढे पाहत नाही. अलीकडेच किंग खान इतिहास रचून अंबानी-अदानी सारख्या श्रीमंतांच्या यादीत सामील झाला आहे. शाहरुख खानने हारुन इंडिया रिच लिस्ट 2024 मध्ये पदार्पण केले आहे. या यादीत जुही चावलासह इतर अनेक स्टार्सचीही नावे आहेत. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 मध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे समाविष्ट आहेत. यावेळी बॉलिवूडमधील पाच जणांनी या यादीत स्थान मिळवले आहे.
 
शाहरुख खान
 
Hurun Rich List 2024
शाहरुख खानने एक नवा टप्पा गाठला असून 7300 कोटी रुपयांच्या संपत्तीसह तो सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी बनला आहे. रेड चिली एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस आणि आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्स, हे या दर्जाचे कारण आहे.
 
जुही चावला

Hurun Rich List 2024 
या यादीत बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला दुसऱ्या स्थानावर असून तिची एकूण संपत्ती 4600 कोटी रुपये आहे. SRK सोबत आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्सची सह-मालक असलेली जुनी चावला बॉलिवूड स्टार्समध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 
हृतिक रोशन

Hurun Rich List 2024
 
यानंतर ग्रीक गॉड म्हणून प्रसिद्ध असलेल्या बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचे नावही श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. हृतिकची एकूण संपत्ती 2000 कोटी रुपये आहे आणि तो HRX नावाची कंपनी चालवतो. त्याच्या संपत्तीला त्याच्या यशस्वी ॲथलीझर ब्रँड, HRX मुळे बळ मिळाले आहे आणि X वर 32.3 दशलक्ष फॉलोअर्ससह सोशल मीडिया फॉलोअर्सच्या बाबतीतही तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 
अमिताभ बच्चन

Hurun Rich List 2024 
मनोरंजन विश्वातील महानायक म्हणजेच अमिताभ बच्चन श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आले आहेत. अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 1600 कोटी रुपये आहे, जी मोठ्या प्रमाणात त्यांच्या विविध गुंतवणुकीतून मिळालेली आहे.
 
करण जोहर
 
Hurun Rich List 2024
धर्मा प्रोडक्शनचा बहुआयामी होस्ट, अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचे नाव हारुन इंडिया रिच लिस्ट 2024 मध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. करण जोहरची एकूण संपत्ती 1400 कोटी रुपये असून तो धर्मा प्रोडक्शन नावाची कंपनी चालवतो.