- माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी घेतले दर्शन
खामगाव :
जनुना येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून श्री संत गजानन महाराज मंदिराची (Shri Sant Gajanan Maharaj temple) आकर्षक निर्मिती केली असून या मंदिरामध्ये संत गजानन महाराजांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व कळस स्थापना सोहळा मंगळवार 2 जुलै 2024 रोजी सकाळी 9 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी निलेश महाराज लंके जनुना यांच्या हस्ते विधीवत पुजा-अर्चा करुन संत गजानन महाराज यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
3 जुलै 2024 रोजी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी संत गजानन महाराज मंदिरामध्ये जावुन श्रींच्या मुर्तीचे पूजन करुन दर्शन घेतले. याप्रसंगी खामगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वानखडे, श्यामसुंदर चांडक, जनुना ग्राम पंचायतचे सरपंच पती संदिप गोरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणेश हरमकार, निलेश लंके महाराज, परमेश्वर हरमकार, महादेव डवंगे, मनोज सुळोकार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी निलेश लंके महाराज यांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा शाल, श्रीफळ देवुन सत्कार केला. 3 जुलै 2024 पासुन या संत गजानन महाराज मंदिर जनुना येथे संगीतमय श्री शिव पुराण कथा व हरिकिर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये हभप संतदास गिरी महाराज तोरनाळा यांच्या अमृतवाणीतून दुपारी 2 ते सायं. 5 वाजेपर्यंत शिवपुराण कथेचे वाचन केले जात आहे.तसेच नामवंत किर्तनकारांची किर्तने सुध्दा पार पडत आहे.या शिवपुराण कथा व हरिकिर्तन सप्ताहाचा बुधवार 10 जुलै 2024 रोजी समारोप होणार आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.